बातमी महिलांच्या कामाची! चक्की, शिलाई मशीन, दाल मिल, मसाला उद्योगाकरीता सरकार देणार ९० टक्के अनुदान! ५ ऑक्टोबर पर्यंत सादर करा अर्ज; कुठे आणि कसा ते वाचा... ​​​​​​​

 

बुलडाणा( जिल्हा माहिती कार्यालय) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सन २०२३-२४ या वितीय वर्षात विशेष घटक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना ९० टक्के अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत, त्याबाबत पुर्वी लाभार्थ्यांकडून दि. २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी आता दि. ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना पिठाच्या चक्कीकरीता ९० टक्के अनुदान. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना शिलाई मशीनकरीता ९० टक्के अनुदान. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मसाला उद्योग यंत्राकरीता ९० टक्के अनुदान. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मिनी दालमिल यंत्राकरीता ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेकरीता अर्ज घेण्याकरीता दि. ५ऑक्टोबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष घटक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना ९० टक्के अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या उपरोक्त योजनेचे अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून दि. ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत एका‍त्मिक बालविकास सेवा योजना, ग्रामीण प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.