चिखलीच्या शिराळे ट्रेडर्स कंपनीत नव्या सोयाबीनची आवक! पहिल्या सोयाबीन मिळाला एवढा "भाव"! महीमळच्या शेतकऱ्याने ७० दिवसांत घेतले उत्पादन

 
ps
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिराळे ट्रेडर्स कंपनीत नव्या सोयाबीनची खरेदी करण्यात येत आली.चिखली तालुक्यातील महीमळच्या शेतकऱ्याने ७० दिवसांत येणाऱ्या सोयाबीनचे उत्पादन घेतले. १५ गुठ्यांत या शेतकऱ्याला साडेचार क्विंटल एवढे उत्पादन झाले.
 

ps

कचरू श्रीराम येवले यांनी प्रायोगिक तत्त्वावर त्यांच्या १५ गुंठे शेतीत उडीद मुगाबरोबर येणाऱ्या सोयाबीनची पेरणी केली होती. या १५ गुंठ्यांत त्यांना साडेचार क्विंटल एवढे उत्पादन झाले. २० सप्टेंबर रोजी त्यांनी सोयाबीनची शिराळे ट्रेडर्स कंपनीत विक्री केली. यावेळी या नव्या हंगामातील सोयाबीनला ५१०० रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला. सोयाबीन खरेदीवेळी अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उमेश लढ्ढा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक काशिनाथअप्पा बोंद्रे, सचिव रमेश शेटे, शिराळे ट्रेडर्स चे संचालक भगवानराव शिराळे, दिलीप पाटील, गणेश गाताडे, गजानन शेळके, पवन शिराळे अडते,व्यापारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.