पिंपळगाव राजात कोरोनाचा नवा बाधित आढळला!

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 नोव्‍हेंबरला कोरोनाचा एक नवा रुग्‍ण समोर आला असून, तो खामगाव तालुक्‍यातील पिंपळगाव राजातील आहे. सध्या रुग्‍णालयांत 7 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 505 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 504 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 127 तर रॅपिड टेस्टमधील 377 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 733273 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86941 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 126 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजअखेर एकूण 87622 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 7 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.