घरकुलच्या मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल ! जळगाव जामोद पंचायत समिती समोर आंदोलन..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
मोदी आवास योजनेतील लाभार्थ्याचे मजु्रांचे मस्टर व बांधकाम पूर्ण झालेले आहे, त्याचा पुढील हफ्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा.
धनगर समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असुन सुद्धा आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याच लाभार्थ्याला लाभ देण्यात आलेला नाही तसेच सरकारद्वारे मोदी आवास योजनेत धनगर समाजाचा समावेश करण्याचे आदेश असुन सुद्धा त्याची पुढील कुठलीही कार्रवाई नसून कुठलाच उद्धीष्ठ (कोटा ) उपलब्ध झालेला नाही. धनगर समाजासाठी लवकरात लवकर स्वातंत्र उद्धीष्ठ (कोटा ) उपलब्ध करून देण्यात यावा.
अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी २०१६ पासून आजपर्यंत घरकुलाची कुठलीही तरतुद करण्यात आलेली नाही त्याची तरतुद त्वरित करण्यात यावी.
रमाई आवास योजने अंतर्गत लवकरात लवकर घरकुलाचे वाढीव टार्गेट उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना देण्यात आले. सदर मागण्याची दखल लवकरात लवकर न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा ईशारा प्रसेनजीत पाटिल यांनी दिला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहराध्यक्ष ईरफान खान, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम.डी.साबीर, युवक जिल्हाध्यक्ष पराग अवचार, महादेव भालतडक,वर्षाताई वाघ, आशिष वायझोडे, सिद्धार्थ हेलोडे, मंगल डोंगरदिवे,राजूबाप्पू देशमुख, अजहर पटेल, वामनराव गुडेकर, दादाराव धंदर, विठ्ठल घुले, सुभाष कोकाटे, मनोहर वाघ, योगेश कुवर,अभिषेक कवळे, सुभाष वानखडे, श्रीराम राजनकर, एकनाथ ताठे, संतोष जवरे,सुहास वाघ, अरुण कोकाटे, राजू जाधव, गोदावरी सोनोने, तुकाराम वाघ, शेख रेहान, सुहास वाघ, संतोष निमकर्डे, राम वाघ, किसन मुंडे, श्रीकृष्ण लोणे, प्रमोद पाटिल, अमोल घुले, यांच्यासह पदाधिकारी तथा शेकडो घरकुल लाभार्थी उपस्थित होते.