नरेंद्राचार्यजी महाराज मंगळवार, बुधवारी शेगावात! समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन...

 

शेगाव (सतोष देठे‌ पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन मंगळवार दिनांक २० व बुधवार दिनांक २१ऑगस्ट २०२४ रोजी श्री गणेश प्रस्थ, मंगल कार्यालय, पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम एस ई बी चौक, खामगाव रोड, शेगांव जि. बुलढाणा येथे सकाळी साडेनऊ वाजता आयोजन करण्यात आले आहे. तशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, पीठ व्यवस्थापक श्री सुरेश मोरे यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे. 

  कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, मोफत रुग्णवाहिका सेवा - महाराष्ट्रात विविध महामार्गावर ५३ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, रक्तदान शिबिर, ब्लड इन नीड आदी आयोजित केली जातात. 
   
  या कार्यक्रमासाठी पश्चिम विदर्भ पिठ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि. २० व २१ ऑगस्ट २०२४ रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमात दिनांक २० रोजी उपासक दीक्षा व दिनांक २१ रोजी साधक दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त भक्तगण यांनी उपासक दीक्षा घेण्यासाठी व उपासक यांनी साधकदीक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोनही दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.