तुमच्या माझ्या बहिणींनी तहसील ,तलाठी कार्यालयावर लावल्या रांगाच रांगा...वाचा काय आहे भानगड?

 
फ्फजक
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) राज्याचा अंतरीम अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना राज्य सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. दरम्यान, या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज १ जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. यासाठी गाव खेड्यातील, शहरातील, गोरगरीब कुटुंबातील लाखो महिला अर्ज प्रक्रियेच्या कामाला लागल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी स्थानिक तलाठी कार्यालयावर महिलांची मोठी गर्दी जमली आहे. रस्त्यापर्यंत ही रांग लागलेली असताना दिसून आले.
ॲड
Advt.👆
राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी सदर योजना प्रत्यक्षात आणल्या गेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. किमान २१ वर्ष पूर्ण ते ६१ वर्षापर्यंत वयाची अट ठेवण्यात आली आहे. लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल, त्यामध्ये आधार कार्ड, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्म दाखला, अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, पासपोर्ट फोटो रेशन कार्ड त्याबरोबरच योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतची हमीपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी १ जुलै ते १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे. आजपासूनच अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याने ठिकठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासकीय विभागात महिलांच्या रांगा लागल्या आहेत.