नवऱ्याचे बाहेर लफडे! बायकोने वटपौर्णिमा झाल्यावर स्वतःला संपवले; चिखली तालुक्यातील "या" गावची घटना; नवऱ्याविरुद्ध व त्याच्या जानूविरुद्ध गुन्हा दाखल
Jun 25, 2024, 08:58 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील वैरागड येथे धक्कादायक घटना घडली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी साजरा केला जाणारा वटपौर्णिमा सण २१ जूनला झाला. सणाच्या दुसऱ्याच दिवशी एका विवाहितेने नवऱ्याला कंटाळून गळफास घेतला. विवाहितेच्या नवऱ्याचे बाहेर एका महिलेशी अनैतिक संबंध होते..त्यामुळे विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी अमडापुर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या नवऱ्यासह त्याच्या जानू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशीला दिपक अंभोरे असे मृतक विवाहितेचे नाव आहे.
विवाहितेच्या माहेरच्यांनी याप्रकणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीनुसार मृतक विवाहितेचा पती दिपक सुरेश अंभोरे याचे बाहेर एका महिलेशी लफडे सुरू होते. विवाहितेला याची कुणकुण लागल्यानंतर पती पत्नीत नेहमी वाद होत होता. दिपक हा पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा..याला वैतागून विवाहितेने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.