BREAKING अतिक्रमण काढण्यासाठी आले पालिका कर्मचारी, व्यावसायिक झाले आक्रमक ! बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात राडा, आंबे विक्रेत्या महिलांनी रस्त्यावर फेकले आंबे अन्...

 
हिंद

बुलडाणा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातील जयस्तंभ चौकात काही वेळापूर्वी चांगलाच राडा झाला! अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांविरोधात व्यावसायिक चांगलेच आक्रमक झाले होते. जयस्तंभ चौकातील आंबे विक्रेत्या महिलांनी रस्त्यावरच आंबे फेकून आंदोलनाचा पवित्रा उगारला होता. दरम्यान, शहर पोलिसांनी घटनास्थळी नियंत्रण आणले. यावेळी बहुसंख्य अतिक्रमण धारक व्यवसायिकांनी प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला असून त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे.