डफडे बजावमुळे दणाणली महावितरण कार्यालये! वन बुलढाणा मिशनच्या आक्रमक आंदोलनामुळे हादरले प्रशासन

 

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विजेच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनात ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील महावितरण कार्यालयांसमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महावितरण कार्यालये दणाणली असून प्रशासन हादरले.

ss

                              जाहिरात👆

सध्या विजेच्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच दिवाळी सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे नियमित विजपुरवठा होणे गरजेचे आहे. याकडे महावितरण कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना दिवसा नियमित १२ तास वीज पुरवठा सुरु ठेवा, ट्रान्सफार्मर जळाल्यास नवीन ट्रान्सफार्मर उपलब्ध करा, दिवाळीत गाव, शहरांमधील वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नये, लोडशेडिंग करु नये आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

kdkkd

बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर येथील महावितरण कार्यालयांवर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी वन बुलढाणा मिशनच्या सदस्यांसह शेतकरी उपस्थित होते.  

बुलढाण्यात गुंजला वन मिशनचा आवाज

बुलढाण्यात महावितरण कार्यालयावर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. वन बुलढाणा मिशनच्या सदस्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता. अधीक्षक अभियंता यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी वसंता इंगळे, रामभाऊ राजपूत, सैय्यद वसीम, दत्ता सावळे, गणेश जाधव, प्रदीप चव्हाण, गोविंद येवले, सागर इंगळे, कृष्णा लांडगे, मंगेश सोनुने, सतीश राजपूत, सचिन परिहार, वैभव काकडे, राजू सुरडकर, महेश सावळे आदींची उपस्थिती होती.