पुरात वाहून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे खासदार जाधव, आमदार रायमुलकरांनी केले सांत्वन! ४ लाख रुपयांचा धनादेशही दिला ​​​​​​​

 
jkl
लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ४ जुलै रोजी लोणार तालुक्यातील शिवणी जाट परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. या पावसात बैलगाडीसह तीन शेतकरी ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेले होते, दोन शेतकऱ्यांच्या हाताला झाडाच्या मुळ्या लागल्याने ते वाचले  मात्र समाधान सरकटे (४८) या शेतकऱ्याचा व एका बैलाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. समाधान सरकटे यांच्या ६ लेकी बापाच्या प्रेमाला मुकल्याने हळहळ व्यक्त करण्यात होती. दरम्यान खासदार प्रतापराव जाधव आणि आ.संजय रायमुलकर यांनी काल,७ जुलैला पीडित कुटुंबाच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. ४ लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेशही त्यांच्या हस्ते पीडित कुटुंबाला प्रदान करण्यात आला.
 

सरकटे कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पितृछत्र हरपल्याने  त्यांच्या मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पित्याची उणीव भरून निघणार नाही मात्र कुटुंबाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहू असे यावेळी खा.जाधव म्हणाले.यावेळी आ. रायमुलकर,तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, मंडळ अधिकारी अनिल डव्हळे, तलाठी मंदार तनपुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, नंदकिशोर मापारी, भगवान पाटील सुलताने, पांडुरंग सरकटे, इम्रान खान पठाण, अंजना गवळी, चंद्रकांत बरले उपस्थित होते.