आंदोलन अपडेट! जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे सर्वच रस्ते बंद! संचारबंदी सदृश्य परिस्थिती! तुपकर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील तरी कसे...?
Feb 11, 2023, 11:03 IST

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रविकांत तुपकर यांचे आत्मदहन किंवा गोळ्या घालून ठार करा आंदोलन आज होणार आहे. सकाळपासून शेकडो पोलीस अधिकारी कर्मचारी बुलडाणा शहरात तैनात करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे सर्वच रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. सर्वच रस्त्यावर पूर्णपणे बॅरिकेटिंग करण्यात आल्याने तुपकर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.