शेतीच्या वादातून जाळली मोटरसायकल! देऊळगाव राजा येथील घटना..
Jul 12, 2024, 12:24 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) देऊळगाव राजा तालुक्यातील किन्ही पवार येथे शेतीच्या वादातून एकाने दुसऱ्याची मोटारसायकल पेटून दिल्याची घटना १० जुलै रोजी घडली.
किन्ही पवार गावातील रहिवासी विशाल चाटे आणि उद्धव तोरमल या दोघांचे शेतीच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरून वाद सुरू आहे. वादाचे प्रकरण टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. दरम्यान, १० जुलै रोजी दोघांचाही वाद उफाळून गेला. यामध्ये विशाल चाटे याने उद्धव तोरमल यांच्या मालकीची एम.एच२८ व्ही ३७६५ क्रमांकाची स्प्लेंडर कंपनीची दुचाकी जाळली.आणि नुकसान केले. यांनतर तोरमल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून विशाल चाटे याच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.