आई आई.....! आई बाजेवरून उठलीच नाही; अंगावरचे पांघरुण काढल्यावर मुलाला धक्काच बसला; १० ग्रॅम सोन्यासाठी घात झाला! सुलतानपुरची घटना..!

 
jfkdl

 लोणार(बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा): लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील बांडा शेतशिवारात राहणाऱ्या ८५ वर्षीय वयोवृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार ४ जुलैच्या  रात्री समोर आलाय. सोन्याच्या मोहापायी हा खून झाल्याचे धक्कादायक कारण उजेडात आले आहे. 

प्राप्त माहितीनुसार दत्तात्रय पाराजी सुरशे हे गावापासून काही अंतरावर स्वतःच्या शेतात घर बांधून राहतात. सुलतानपूर येथील आठवडी बाजार असल्याने ते व त्यांची पत्नी गावात बाजारासाठी गेले. परत आल्यानंतर त्यांना त्यांची ८५ वर्षीय वृद्ध आई मृत दिसून आली व गळ्यातील पोथ सुद्धा लंपास होती. शेताच्या शेजारी सालगडी म्हणून काम करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने दोन ग्राम सोन्यासाठी ही हत्या केल्याची बाब उघड झाली आहे.

  मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुलतानपूर येथील चंद्रभागाबाई पाराजी सुरुशे ह्या मुलगा व सुनेसोबत गावापासून दीड किमी अंतरावर असलेल्या आपल्या शेतातील घरात राहतात. ४ जुलै रोजी सुलतानपूर येथील आठवडी बाजार असल्याने त्यांचा मुलगा दत्तात्रय पाराजी सुरुशे व त्याची पत्नी हे दोघे सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेले. मध्येच पाऊस आल्याने या दोघांना घरी परत येण्यास रात्रीचे दहा वाजले.घरी परत आले असता त्यांना आई बाजेवर झोपलेली व तीच्या अंगावर ब्लॅकेट पांघरलेली दिसून आली. त्यांनी आवाज दिला तरी आईचा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आईजवळ जावून अंगावरील ब्लॅकेट काढून पाहीले असता आई गतप्राण झाल्याचे समजले. चंद्रभागाबाईच्या उजव्या डोळ्यावर व गालावर मारहाणीचे व्रण दिसून आले आणि गळ्यातील पोथही लंपास होती. या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ नागरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाये, पोहेकॉ. शे. खालिद, मोहम्मद - परसूवाले व राजेश उबरकर यांनी घटना स्थळ गाठून पाहणी करत पंचनामा केला. कोणावर संशय आहे का? असे विचारले असता मृतकाच्या मुलाने भाऊसाहेब झोरे यांच्या शेतात सालगडी असलेला न मारोती प्रल्हाद पानझाडे वय ४६ यांच्यावर संशय व्यक्त केला.

पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलीसीखाक्या दाखविताच त्याने आपणच खून केल्याची कबुली दिली. अवघ्या दोन ग्राम सोन्यासाठी त्याने ८५ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याची बाब उघड झाली.

 यापूर्वीही केले आहेत दोन खून

या घटनेतील आरोपी मारोती प्रल्हाद पानझाडे हा मूळ नंदुरबार येथील रहिवासी असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे त्याच्या पोलीस रेकॉर्डवरुन समोर आले आहे. त्याच्यावर सहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी दोन खुनाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असून मेहकर पोलिसांनी आता तिसऱ्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.