शिंदी हराळीत आमदार श्वेताताईंनी आणली विकासाची गंगा! ४ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे केले भूमिपूजन! म्हणाल्या, मतदारसंघाचा कायापालट करणार..
Sep 27, 2023, 09:27 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चार वर्षांपूर्वी राज्यातल्या जनतेने भाजपा - शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमताच्या रुपाने आशीर्वाद दिला होता. हाच आशीर्वाद घेऊन वर्षभरापूर्वी राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या माध्यमातून चिखली मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी येत आहे व या निधीमधून शहरी आणि ग्रामीण भागाचा कायापालट आपण करत आहोत असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. चिखली तालुक्यातील सिंदी हराळी येथे दि. २४ सप्टेंबरला चार कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना त्या बोलत होत्या.
शिंदी हराळी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ३९ लक्ष रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना, नाबार्ड अंतर्गत ८० लक्ष रुपयांचा गाव जोड रस्ता, रोहयो अंतर्गत ४८ लक्ष रुपये किमतीचा काळूंका माता मंदिर ते तेल्हारा शिव रस्ता, रोहयो अंतर्गत ४८ लक्ष रुपये किमतीचा शिंदी हराळी ते खंडाळा शिव रस्ता, डीपीडीसी अंतर्गत २५ लक्ष रुपयांचा जोड रस्ता, रोहयो अंतर्गत २० लक्ष रुपये किमतीचा सिमेंट रस्ता, रोहयो अंतर्गत १० लक्ष रुपये किमतीचा सिमेंट रस्ता, सामाजिक न्याय अंतर्गत ७ लक्ष रुपये किमतीचा सिमेंट रस्ता, सामाजिक न्याय अंतर्गत ८ लक्ष रुपये किमतीचा सभामंडप, २५१५ अंतर्गत ६ लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता, २५१५ अंतर्गत १० लक्ष रुपये किमतीचा सभामंडप, २५१५ अंतर्गत ७ लक्ष ५० हजार रुपये खर्चून बस थांबा बांधकाम व आसन व्यवस्था करणे, १५ लक्ष रुपये किमतीचे स्मशानभूमी भिंत बाधकाम या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. प्रतापसिंग राजपूत प्रदेश कार्यकारिणी सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आशिष पवार, गटविकास अधिकारी भारसाकळे, प्रा. वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुकाध्यक्ष भाजप, सुनील पोफळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, संतोष काळे तालुकाध्यक्ष युवा मोर्चा, ग्रामसेवक हिवाळे, राम रिंढे, अनिल जैवाळ, सरपंच संजय वाघमारे, सरपंच विजय धंदर, सरपंच समाधान रिठे, गुलाब सोनारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच स्वातीताई प्रमोद सपकाळ, उपसरपंच नंदाताई गजानन सपकाळ, तथा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रीपाई आठवले गट, रासप, शिवसंग्राम, प्रहार तसेच मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समस्त सदस्य ग्रामपंचायत व ग्रामस्थ, शिंदी हराळी यांनी केले होते.