चिखलीत अल्पवयीन मुलीचे अपहरण! माळीपुऱ्यातल्या शुभम कांबळे वर संशय; मुलीची आई म्हणाली, मुलीच्या फोनवर रात्री फोन करायचा..! "त्या" दिवशी क्लासमध्ये तीच पोट दुखत होत..नेमक काय घडलं? वाचा...

 
Police station chikhali
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातील माळीपुरा भागातील १२ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे. माळीपुरा भागात राहणाऱ्या शुभम रवींद्र कांबळे या तरुणावर मुलीच्या आईला संशय आहे. त्यानेच आपल्या मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार पीडित मुलगी चिखली शहरातील माळीपुरा भागात राहणारी असून तिचे वय १७ वर्षे ४ महिने इतके आहे. मुलीने चिखली तालुक्यातील एका खेड्यातील कनिष्ठ महाविद्यालयात १२ विला प्रवेश घेतलेला आहे. चिखली शहरातीलच एका खाजगी शिकवणी वर्गात ती "नीट" परीक्षेची तयारी करीत होती असे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
   
एक दिवस रात्री...
१२ जुलै रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मुलीच्या स्मार्टफोनवर एका नंबर वरून फोन आला. ट्रूकॉलर वर शुभम कांबळे म्हणून नाव दिसत होते. यावेळी फोन मुलीच्या आईजवळ होता, मुलीच्या आईने फोन उचलला तेव्हा समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा शुभम कांबळे हा आपल्या मुलीशी फोनवरून बोलतो हे कळले, त्यामुळे मुलीचा मोबाईल तिच्या आईने घेतला.
 
  असे झाले अपहरण..
दिनांक १५ जुलै रोजी सकाळी सव्वासात वाजता मुलगी ट्युशन क्लास ला गेली होती. मुलीची आई दुपारी ४ वाजता शेतातून घरी आली मात्र त्यावेळी मुलगी घरी नसल्याचे दिसले. मुलीच्या आईने ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांना फोन केला तेव्हा तुमच्या मुलीचे सकाळी ८ वाजता पोट दुखत होते, तेव्हाच ती घरी गेल्याचे सांगितले. हा प्रकार एकूण मुलीच्या आईला धक्काच बसला. सगळ्या नातेवाईकांना फोन करून बघितला मुलगी कुठेच नव्हती. त्यामुळे शुभम कांबळे याच्यावर संशय आल्याने त्याच्या घरी जाऊन चौकशी केली, त्यावेळी शुभम कांबळे हा सुद्धा घरी नसल्याचे कळाल्यावर मुलीच्या आईची पक्की खात्री झाली की मुलीला शुभम कांबळे यानेच पळवून नेले. अखेर पोलीस ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली असून तक्रारीवरून शुभम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.