सैलानी यात्रेत आज पेटणार लाखो नारळाची होळी! तब्बल तीन वर्षानंतर आयोजन! कोरोनामुळे तीन वर्षे बंद होता उत्सव! दंगाकाबु पथकासह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त..!

 
Fghgg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रेत आज,६ मार्च रोजी सायंकाळी लाखो नारळाची होळी पेटणार आहे. कोरोनामुळे तब्बल ३ वर्षे हा उत्सव बंद होता, त्यामुळे ३ वर्षानंतर होणाऱ्या या उत्सवासाठीची आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

   देशभरातील भाविक यात्रेच्या निमित्ताने सैलानी येथे येत असतात. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली होळी आज पेटणार आहे. बुलडाणा पंचायत समितीच्या वतीने होळीत नारळ टाकण्यासाठी मोठा गड्डा खोदण्यात आला आहे. तसेच होळीच्या भोवती पोलीस प्रशासनाने बॅरिकेट्स लावले आहेत. तीन वर्षानंतर यात्रा महोत्सव होत असल्याने देशभरातून लाखो भाविक यात्रेसाठी येत आहेत. 

   आज,दुपारी ३ला शेख रफिक मुजावर, हाशम मुजावर, चांद मुजावर यांच्या हस्ते पूजन करून होळी पेटवल्या जाणार आहे. दरम्यान अग्निशमन दलाचे ३ बंब प्रशासनाने सज्ज ठेवले आहेत. पोलिस अधीक्षक सारंग आवाड,अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम मार्गदर्शनाखाली दोन पोलिस निरीक्षक , सहाय्यक पोलिस निरीक्षक, ३० पोलिस उपनिरीक्षक, ३७५ पोलीस कर्मचारी,३०० होमगार्ड व दंगाकाबू पथक तैनात करण्यात आले आहे.