मेहकर नगरपरिषदेने पकडले घबाड! व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

 
ghj
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर नगरपरिषद  प्रशासनाने काल,१ ऑक्टोबरला मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे व्यवसायीकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोन क्विंटल प्लास्टिक पिशव्या नगरपरिषद प्रशासनाने जप्त केल्या.
 

मेहकर नगरपरिषद प्रशासनाने वारंवार प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचे आवाहन केले, मात्र तरीही विविध दुकानांवर प्लास्टिक मधून माल मिळत होता. त्यामुळे प्रशासक रमेश ढगे यांच्या नेतृत्वात नगरपरिषद प्रशासनाने धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला . शहरातील विविध दुकानानांवरून तसेच राजीव गांधी कॉम्प्लेक्स मधील कमल ट्रेडर्स व यश ट्रेडर्स या दुकानांतून अंदाजे दोन क्विंटल प्लास्टिक जप्त केले. जप्त केलेले हे प्लास्टिक जवळपास ६ लाख रुपयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई करतेवेळी प्रशासक ढगे यांच्यासोबत उपमुख्यअधिकारी रवींद्र वाघमोडे, कार्यालय अधीक्षक अजय चैताने, कर निरीक्षक सुधीर सारोळकर, आरोग्य निरीक्षक संजय गिरी व सर्व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.