मंगल कार्यालय चालकांनो कोरोना वाढतोय... निर्बंध पाळा! ५० जणांच्या उपस्थितीत उरका लग्न!!; प्रभारी ठाणेदारांच्या सूचना

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बुलडाणा शहरातील मंगल कार्यालये, लॉन्सचालक- मालकांना निर्बंध पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागातर्फे बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार गिरीश ताथोड यांनी ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न सोहळे होऊ द्या, असे आवाहन केले.
आज, ११ जानेवारीला शहरातील मंगल कार्यालय व लॉन्स चालक-मालकांची बैठक बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री. ताथोड यांनी बैठकीत दिला.