BREKING खामगावात मराठा समाज बांधव आक्रमक! एसटी बसेस वरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले....
Oct 31, 2023, 16:50 IST
बुलडाणा(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यभर व्यापक लढा सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज,३१ ऑक्टोबरला सातवा दिवस आहे. ४० दिवसांची मुदत देऊनही सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठवाड्यातील आक्रमक आंदोलनाचे लोण आता बुलडाणा जिल्ह्यातही पसरले आहे. खामगावात आज एसटी बसेस वरील जाहिरातीतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला मराठा समाज बांधवांनी काळे फासले.
खामगाव बस स्थानकावर मराठा समाज बांधव प्रचंड आक्रमक पवित्र्यात दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोटोला काळे फासून समाजबांधवांनी रोष व्यक्त केला. खामगावच्या टॉवर चौकात ३ दिवसापासून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण देखील सुरू आहे.