महावितरणने घेतला तरुणाचा जीव! फवारणी करतांना लोंबकळत्या तारांना स्पर्श; मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडीची घटना; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी

 
Gcn
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे एका तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. शेतात फवारणी करीत असतांना ही घटना घडली.
अभिषेक राठोड(१८, रा. विठ्ठलवाडी, ता.मेहकर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिषेक संतोष राऊत यांच्या शेतात फवारणी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी शेतात लोंबकळत असलेल्या तारांना स्पर्श झाल्याने अभिषेकला शॉक बसला. त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या शेतात विजेच्या तांबा लोंबकळत होत्या, वीज वितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळेच अभिषेकचा बळी गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.