मा. आगार व्यवस्थापक साहेब, प्रवाशांच्या जीवाशी खेळूं नका; माळवडींच्या ग्रामस्थांनी काय केली मागणी?

 
बुलडाणा(राहुल रिंढे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा आगारातून निघणारी बुलडाणा ते माळवंडी ही बस थेट पूर्वीसारखी थेट माळवंडी न जाता फिरून अंभोडा मार्गे जाते. त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशां बस मध्ये बसतात.माळवंडी येथील प्रवाशांना, बुलडाणा येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना बस मध्ये बसायला जागाच राहत नाही. त्यामुळे बुलडाणा ते माळवंडी ही बस सेवा हतेडी मार्गे सुरू ठेवावी अशा आशयाची मागणी माळवंडी येथील ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. 
सध्या ही बस सेवा अंभोडा,देवपूर दुधा या मार्गे सुरू आहे. अरुंद रस्ते असल्याने काल, या गाडीचा अपघात होत होता असेही बसमधील माळवंडीच्या प्रवाशांनी संगितले. बसेस भंगार झाल्याने त्या कधीही बंद पडतात, त्यामुळे बुलडाण्यात अतिमहत्त्वाच्या कामासाठी पोहोचण्यास बऱ्याचदा उशीर होतो अशी इथल्या ग्रामस्थांची तक्रार आहे.