मा. जि. प. सदस्या ज्योतीताई खेडेकर असंख्य शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्या! म्हणाल्या, शेगाव - सिंदखेड राजा भक्तीमहामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठला..

 
Gjvx

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शासनाने प्रस्तावित केलेला शेगाव - सिंदखेडराजा भक्ती महामार्ग शेतकऱ्यांचा जीवावर उठला असून यासाठी हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित केल्या जात आहे. यामुळे असंख्य शेतकरी भूमिहीन होत असून शासनाने निर्णय बदलून त्वरित काम थांबवावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या ज्योती खेडेकर यांनी केली. याप्रकरणी आज २० जून रोजी चिखली तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्या, बोलत होत्या. 

शेगाव सिंदखेडराजा या भक्ती मार्गाचा शासन आदेश निघाल्यापासून नव्हे तर सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शेगाव ते सिंदखेड राजा जाण्यासाठी आधीच चांगला रस्ता आहे. यासाठी नवीन मार्गाची गरज काय? असा सवाल शेतकऱ्यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे..या मार्गाने केवळ २० ते २५ मिनिटे जास्त लागू शकतात. या महामार्गामध्ये येत असलेल्या शेत जमिनींना शासन मोबदला देत आहे, तरी ते पुरणारे नाही. असंख्य शेतकऱ्यांना भूमिहीन बनवण्याचे या महामार्गातून होत आहे. त्यामुळे, शेतकरी सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत आहेत. आज मा.जि. सदस्या ज्योती खेडेकर यांच्या नेतृत्वात चिखली तालुक्यातील गांगलगाव, पांढरदेव करतवाडी, एकलारा, आंबाशी, मानमोड, घाणमोड, कवठळ, अंढेरा, अंत्री खेडेकर येथील असंख्य शेतकऱ्यांनी निवेदन दिले. हा महामार्ग रद्द न झाल्यास, नाईलाजाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल. असे निवेदनात म्हटले आहे.