लोणारची इज्जत चव्हाट्यावर! नगरपरिषदेचा गलथान कारभार.. वाचा काय आहे मॅटर?

 
लोणार (सचिन गोलेच्छा : बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) लोणार...हे तस जगप्रसिद्ध शहर..आपल्या बुलडाणा जिल्ह्याच वैभवच म्हणा की.. खाऱ्या पाण्याच सरोवर, प्राचीन मंदिर असं सगळ काही या शहरात आहे..देश विदेशातील लोकांना या शहराच आकर्षण..मात्र तरीही इथे फार प्रमाणात पर्यटकांचा ओढा नाही..जे काही पर्यटक येतात ते सरोवराच सौंदर्य तर डोळ्यात साठवून ठेवतात पण या शहरात फिरतांना तर त्यांना इथल्या अस्वच्छतेची किळस यावी अशी परिस्थिती..थोडक्यात काय तर शहराची इज्जत चव्हाट्यावर आणण्याचं काम लोणार नगर पालिका प्रशासनाकडून होतांना दिसतंय..आपल शहर स्वच्छ शहर अशा पाट्या नगरपरिषदेकडून लावलेल्या दिसतात खऱ्या पण जिथे पाट्या तिथंच घाणीचे साम्राज्य..!
Add
Add .                          ( जाहिरात 👆)
पसरलेला कचरा आणि साचलेले दूषित पाणी यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. शिवाजीनगर, भाजी मार्केट, रामनगर, शिक्षक कॉलनी, प्रताप चौक या भागात विदारक चित्र आहे. नालीसफाईसाठी नेमलेल्या कंपनीचे कंत्राटदार कमी कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. एकंदरीत संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.