लोणार तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड! अध्यक्षपदी प्रमोद वराडे तर सचिव पदी सचिन गोलेच्छा यांची निवड; नवनियुक्त अध्यक्ष म्हणाले,संघटनेला गतवैभव प्राप्त करून देऊ...
बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात झाली.डॉ.अनिल पाटील,उमेश पटोकार, राहुल सरदार,विठ्ठल घायाळ यांनी विचार व्यक्त करून नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नव्या कार्यकारिणीच्या निवडीचे सर्वाधिकार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव डॉ.अनिल मापारी यांना देण्यात आले. त्यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून नव्या कार्यकारणीची निवड केली.
नव्या कार्यकारणीत प्रमोद वराडे यांची अध्यक्षपदी , कार्याध्यक्षपदी गोपाल तोष्णीवाल तर सचिव म्हणून सचिन गोलेच्छा यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून श्याम सोनुने व रमेश खंडागळे (बिबी), कोषाध्यक्षपदी किशोर मोरे (दाभा),सह कोषाध्यक्ष म्हणून अशोक इंगळे, सहसचिव म्हणून किशोर मापारी, प्रवक्ता पदी राहुल सरदार, प्रसिध्दी प्रमुख शेख यासिन यांची निवड करण्यात आली. यानंतर मावळते अध्यक्ष शेख समद आणि मावळते सचिव पवन शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या २ वर्षाच्या कार्यकाळात सहकार्य मिळाल्याची भावना सेख समद यांनी व्यक्त केली. नवनियुक्त अध्यक्ष प्रमोद वराडे यांनी नियुक्तीबद्दल आभार व्यक्त करीत संघटनेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा शब्द देत लोणार मध्ये पत्रकार भवनासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला.सभेचे संचालन गोपाल तोष्णीवाल यांनी तर आभार सचिन गोलेच्छा यांनी मानले. यावेळी पत्रकार सुनील वर्मा, विजय गोलेच्छा, संदीप मापारी, संतोष पुंड, ज्ञानु सुपेकर, प्रणव वराडे, रहेमान नौरंगाबादी, उमेश कुटे, नंदू डवले उपस्थित होते...