लोणार, जळगाव जामोदला बाल न्याय मंडळाची बैठक

 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) मंडळाची फिरती बैठक उद्या, १२ नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद येथील पंचायत समिती सभागृहात आणि १३ नोव्‍हेंबरला लोणार येथील हिरडव रोडवरील आशा बालकाश्रमात होणार आहे.
बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अमोलकुमार देशपांडे, प्रमुख दंडाधिकारी, बाल न्याय मंडळ, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.