मंगरूळ नवघरे, वरखेड परिसरात बिबट्याची दहशत! म्हशीचे पिल्लू फाडले...

 
jjdk
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी सध्या सोयाबीन काढणी आणि रब्बी हंगामाच्या तयारीत गुंतले आहेत. मात्र अशा स्थितीत चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे, वरखेड परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आज वरखेड शिवारात बिबट्याने म्हशीच्या पिल्लाला फाडून टाकल्याची घटना उघडकीस आली.
 

वरखेड( ता.चिखली) येथील शेतकरी प्रदीप सूर्यनारायण कणखर यांच्या गोठ्यातील म्हशीच्या पिल्लाची बिबट्याने शिकार केली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याआधी देखील परिसरात बिबट्याने अनेक शेतकऱ्यांना दर्शन दिले आहे. शेतात हंगामाची कामे सुरू असली तरी शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.