मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाचालक आमदार सतीश चव्हाण ,प्रकाश सोळंके यांच्यावर कायदेशीर कारवाई करा! चिखलीत ओबीसी बांधवांचे निवेदन.

 
Fhu
चिखली(बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा):
ओबीसी समाज बांधवांवर होणारा अन्याय अत्याचार थांबवून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे  संस्थाचालक आ. सतीश चव्हाण, आ.प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष अमरसिंह पंडित  यांच्यावर खडक कायदेशीर कारवाई करणे बाबत ओबीसी बांधवांनी  मंगळवार, १२ मार्च रोजी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. 

सदर निवेदनात नमूद आहे की, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील वैजापूर येथील विनायक पाटील महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून ओबीसी समाजाचे प्रा. डॉक्टर सुरेश घुमटकर  कार्यरत होते. त्यांच्या फेसबुक पोस्टचा आधार घेत बीड येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे महेश धांडे यांनी पोलीस ठाण्यात बनावट फिर्याद दिली. त्यावरून बीड पोलिसांनी प्रा. घुमटकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यात अटकेची गरज नसताना सुद्धा फिर्यादी आणि तपास अधिकारी किरण पवार यांनी संगणमत करून डॉ. घुमटकर यांच्या घरी तीन पोलीस अधिकारी नेऊन तुमच्याशी साहेबांना चर्चा करायची आहे असे सांगत पोलीस स्टेशनला आणले. व  तुरुंगात डांबण्यात आले. दुसऱ्या दिवशी बीड जिल्हा सत्र न्यायालयातून दोन दिवसांचा पीसीआर मंजूर करून घुमटकर यांना पोलीस कोठडीत मानसिक ,शारीरिक  त्रास दिला व त्यांची आर्थिक लूट केली.

 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस तथा छ. संभाजीनगर पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी गुन्ह्याची सत्यता न पडताळता १८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रा. डॉक्टर सुरेश घुमटकर यांना सेवेतून निलंबित केले.   असे निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून प्राध्यापक डॉ. सुरेश घुमटकर यांची निलंबन मागे घ्यावे व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या   पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी  करण्यात आली आहे.