२० मार्चला घरून गेले होते! आज कुजलेला मृतदेह आढळला; खून की आत्महत्या? शेगावात खळबळ..!

 
policestation
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २० मार्चला कामासाठी  घरून बाहेर पडलेल्या व्यक्तीचा आज थेट कुजलेला मृतदेह आढळला. शेगाव शहरालगत असलेल्या नवीन वस्तीच्या बाजूला उघडकीस आलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह ४८ वर्षीय व्यक्तीचा असून  शे. शाबिर शे. गफुर असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. 
 

प्राप्त माहितीनुसार शेगाव शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गुलमोहर ले-आऊट मधील एका निंबाच्या झाडाखाली आज सकाळच्या सुमारास एक कुजलेला मृतदेह आढळला. याबाबतची माहिती शे शाबिर शे गफुर यांच्या मुलाला कळताच त्याने घटनास्थळी धाव घेतली. २० तारखेपासून गायब असलेल्या आपल्या वडिलांचा मृतदेह असल्याचे त्याने ओळखले.शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून केला असून ही हत्या की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहेत.