शिरपुरच्या सरपंचपदी सौ लक्ष्मीबाई सुसर अविरोध! म्हणाल्या, गावाचा चौफेर विकास करणार

 
dfghjk

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  तालुक्यातील शिरपूर येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ लक्ष्मीबाई जनार्दन सुसर यांची अविरोध निवड झाली. काल, ३१ ऑगस्ट रोजी ही प्रकिया पार पडली.

 २०२१ मध्ये शिरपूर ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली होती. त्यावेळी सौ दुर्गाबाई दिनकर शेळके यांची अडीच वर्षासाठी सरपंच पदी निवड झाली होती. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षांसाठी लक्ष्मीबाई सुसर या सरपंच राहतील असे ठरले होते. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर १ ऑगस्टला दुर्गाबाई शेळके यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल,३१ ऑगस्ट रोजी झालेल्या सरपंच निवड प्रक्रियेत लक्ष्मीबाई सुसर यांची अविरोध निवड करण्यात आली. पुढल्या अडीच वर्षात गावाच्या विकासासाठी शक्य ते प्रयत्न करू, गावाचा चौफेर विकास करू अशी प्रतिक्रिया यावेळी नवनियुक्त सरपंच लक्ष्मीबाई सुसर म्हणाल्या...