कुलदीप जंगम आज स्वीकारणार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार!

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार आयएएस अधिकारी कुलदीप जंगम आज, ७ जून रोजी स्वीकारणार आहेत.

Jvvv
                           जाहिरात👆
नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कुलदीप जंगम कामकाज पाहत होते. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशान्वये कुलदीप जंगम यांची बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार बी.एम. मोहन यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशान्वये कुलदीप जंगम बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.