बुलडाणा लाइव्ह चे कृष्णा सपकाळ झाले व्हॉईस ऑफ मिडीयाचे जिल्हा कार्याध्यक्ष! गजानन धांडे सरचिटणीस तर निलेश जोशींवर चिटणीस पदाची जबाबदारी!

 
Press
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्हॉईस ऑफ मिडिया या भारतातील पत्रकारांची सर्वात मोठा संघटना असलेल्या संघटनेची जिल्हा बैठक आज,२४ डिसेंबरला बुलडाणा येथील पत्रकार भवनात झाली. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, कोअर कमिटी सदस्य अरुण जैन, सिध्देश्वर पवार, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लाइव्ह ग्रुप चे समूह सल्लागार कृष्णा सपकाळ यांची व्हॉईस ऑफ मिडीयाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला.
Hxnx
                           जाहिरात 👆
बुलडाणा येथील पत्रकार भवनात झालेल्या जिल्हा बैठकीला जिल्ह्यातील सर्वच तालुकाध्यक्ष उपस्थित होते. संघटनेच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेत, आगामी कार्यक्रमाबाबत चिंतन यावेळी करण्यात आले. यावेळी संघटना वाढीच्या दृष्टीने नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. यात जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कृष्णा सपकाळ, जिल्हा सरचिटणीस म्हणून गजानन धांडे, चिटणीस म्हणून निलेश जोशी, जिल्हा संघटक रवींद्र पाटील कळसुंदर, प्रसिध्दी प्रमुख अण्णा वंत्रोले तर प्रवक्ता म्हणून आदेश कांडेलकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. साप्ताहिक विंगच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी भाऊ भोजने यांची नियुक्ती करण्यात आली.