जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार शेतकरी सन्मान निधी! राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनाचाही हफ्ता जमा होणार; त्याआधी शेतकऱ्यांना करावे लागणार "हे" महत्वाचे काम..

 
Hvvv
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ जुलै २०२४ च्या शेवटी वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रलंबित ईकेवायसी तात्काळ करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ४ हजार ७८९ शेतकऱ्यांची ईकेवायसी आणि ४ हजार ८४१ शेतकऱ्यांचे आधार सीडींग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ईकेवायसी आणि आधार सीडींग व बँक खात्याला डीबीटी जोडणी करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डीबीटी जोडणी करण्याचे काम तात्काळ पूर्ण करावे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ईकेवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे. ईकेवायसी आणि आधार सीडींग अभावी शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक, गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.