चिखली तालुक्यातील 'ही' गावे महावितरणच्या चिखली उपविभागातच ठेवा ! उदयनगर उपविभाग समावेशाला १६ गावांचा विरोध...

 
चिखली( ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) 
महावितरणच्या चिखली उपविभागामधे येत असलेल्या चिखली ग्रामीण शाखा १ मधील १६ गावांचा नवनिर्मीत उदयनगर (उंद्री)उपविभागामधे समावेश करणार असल्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. महावितरणच्या या निर्णयाला १६ गावातील सरपंचांनी विरोध दर्शविला आहे. पूर्वीप्रमाणे गावे चिखली उपविभागातच राहू द्या, अशी मागणी १६ गावातील सरपंचांनी केली असून अधीक्षक अभियांतांकडे याबाबत निवेदन देण्यात आले. 

 
१६ गावांचा समावेश महावितरण उदयनगर उपविभागात करण्याच्या निर्णय अडचणीचा आहे. भविष्यात ३०ते४० की. मी. अंतर जावून लाईन संदर्भातील कामे करावी लागणार असल्याने अनेक ग्रामपंचायत सरपंचांनी या निर्णयाला हरकत घेतली. तर यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी चिखली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांच्यासह महावितरणचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली असुन सदरील १६गावे चिखली परीसरातील असल्याने यांचा समावेश उदयनगर उपविभागामधे करण्यात येवु नये,अन्यथा ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा विनायक सरनाईक यांच्यासह सरपंच व सरपंच प्रतिनिधी यांनी दिला आहे.तर यावर ग्राहकांच्या हिताचा योग्य निर्णय घेवू असे अश्वासन अधिक्षक अभियंता कटके व कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिले.
चिखली ग्रामीण १ हे शाखा कार्यालय नवनिर्मीत उदयनगर(उंद्री) उपविभागामधे समाविष्ट करण्यात आले आहे.यापुर्वी चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज,भालगाव,कोलारा, मुंगसरी,आंबाशी,एकलारा,
काटोडा,खैरो,रानअंत्री,शेलगाव जहागीर,आमखेड,भोरसा भोरसी,पाटोदा,कवठळ, चंदणपुर,गांगलगाव,देवदरी या गावांचा समावेश चिखली उपविभाग मधे होता.तर या गावातील ग्राहकांना चिखली उपविभाग सोयीस्कर पडत होता.तर चिखली तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्राहक महावितरणचे कामे देखील सहज पध्दतीने करीत होते.तहसिल कार्यालय हे चिखली त असल्याने अनेक महावितरणचे कामे हि तहसिलच्या माध्यमातुन होतात, विशेष म्हणजे या गावची बाजार पेठ सुद्धा चिखली आहे.परंतु वरील गावांचा आपण उदयनगर उपविभागामधे करणार असल्याने यातील अनेक गावतील ग्राहक शेतकऱ्यांना त्यांच्या लाईनच्या कामासाठी अनेकांना ३० ते ४० की. मी. वरचा प्रवास करावा लागणार आहे.विशेष म्हणजे हि सर्व १६गावे चिखली पासुन २०की मी अंतरच्या आतील आहे.चिखली उपविभागातुन सदर चिखली शाखा १ उदयनगर मधे समावेश करणे हि बाब महावितरण कार्यालय चिखली व शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरणार असल्याने व याला ग्राहकांचा विरोध देखील आहे.सदरील १६गावे पुर्वीप्रमाणे जै से थे ठेवण्यात यावी,या गावा व्यतिरिक्त उदय नगर परीसरातीलच गावांंचा त्या उपविभागामधे समावेश असावा जेणेकरून त्या ग्राहकांना त्यांचा फायदा होईल अशीही मागणी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक, पाटोदा गावचे सरपंच प्रदिप सोळंकी,एकलारा सरपंच प्र गजानन आंभोरे, आमखेड सरपंच प्र जगन्नाथ वाघ,शेलगाव जहागीर सरपंच अरुण सरनाईक यांच्यासह आदि सरपंच यांनी अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन केली आहे.याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असुन ग्राहक संस्खा वाढली परंतु याचे विभाजी कारण योग्य पध्दतीने व्हावे या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली.दरम्याण योग्य निर्णय महावितरण कडुन घेऊ, ग्राहकांना अडचणीचा होईल असा निर्णय घेणार नाही तर आपली मागणी योग्य असल्याने योग्य निर्णय घेणार असल्याचे अश्वासन देण्यात आले आहे.
'या' ग्रामपंचायतींनी नोंदवल्या हरकती.! 
चिखली उपविभागातील गावे उदयनगर मधे टाकणे हि बाब ग्राहकांवर अन्याय करणारी व भविष्यात त्रासदायक ठरणार असल्याने चिखली परीसरातील खंडाळा मकरध्वज,शेलगाव ज,भोरसा भोरसी,पाटोदा,एकलारा,कोलारा व भालगाव यासह इतर गावांनी ग्रामपंचायतचा हरकत ठराव केला आहे.