पत्रकार मनोज सांगळे लिखित"द अनटोल्ड स्टोरी" ई - बुकचा प्रकाशन सोहळा आज! ज्येष्ठ चित्रपट संगीतकार अतुल दिवेंच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरात होणार प्रकाशन;

मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील मिसाळवाडीचे आहेत लेखक मनोज सांगळे

 
sangle
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दैनिक पुढारीचे वरिष्ठ उपसंपादक पत्रकार मनोज सांगळे लिखित "द अनटोल्ड स्टोरी" या ई - बुक चे प्रकाशन आज,१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर होत आहे. ज्येष्ठ चित्रपट संगीतकार अतुल दिवे यांच्या शुभहस्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पिंपळवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरातील गारखेडा परिसर , विश्वभारती कॉलनी मध्ये असलेल्या स्वरसाक्षी स्टुडिओ मध्ये सायंकाळी ६ ला हा सोहळा संपन्न होणार आहे.

sagvan

          (जाहिरात👆)
    
लेखकांचा संक्षिप्त परिचय...

“द अनटोल्ड स्टोरी’चे लेखक मनोज सांगळे हे गेल्या १८ वर्षांपासून मराठी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी आघाडीच्या दैनिकांच्या संपादकीय विभागात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डिजिटल मीडियालाही वेगळी ओळख निर्माण करून देण्यात त्यांचा हातभार राहिला आहे. मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मिसाळवाडीचे ते रहिवासी. शिक्षण आणि नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगरला आले आणि इथेच स्थायिक झाले. त्यांची जन्मभूमी बुलडाणा आणि कर्मभूमी छत्रपती संभाजीनगर.

राजकीय, सामाजिक विषयांवरील त्यांचे लिखाण आजवर विशेष चर्चेत राहिले. त्यांना ३ प्रतिष्ठित पुरस्कारही प्राप्त झाले असून, छत्रपती शिवाजी नॅशनल मेमोरियल कमिटी नवी दिल्लीचा जोतिबा फुले पत्रगौरव पुरस्कार, चिखलीतील झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनात झेप पत्रकारिता पुरस्कार आणि आरोग्यम्‌ संस्थेतर्फे कोरोना योद्धा या पुरस्कारांनी त्यांना गौरवले गेले आहे. सकारात्मक पत्रकारितेवर त्यांचा आजवर भर राहिला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी आता साहित्य क्षेत्रातही पदार्पण केले आहे.