जिजाऊंचे नाव हा कृषी महाविद्यालय वादातील सुवर्ण मध्य; विधिज्ञ जयसिंग देशमुख यांनी सुचवला नवा पर्याय! माजी आमदार रेखाताई म्हणाल्या... ​​​​​​​

 
politics

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कृषी महाविद्यालय व्हावे ही अनेक दिवसांची जिल्हा वासीयांची मागणी होती. ती पूर्ण होत असताना विद्यालयाच्या नावाचा मुद्दा पुढे येत आहे. याबाबत वेगवेगळी मते देखील दिसून येत आहे. ही मते मतांतरे वाद विवादात बदलली तर हा वाद न्यायलयात जाऊ शकतो. तसे संकेत मिळत आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रिये पेक्ष्या मातृतिर्थ जिल्ह्याचा विचार करून जिजाऊंचे नाव हा सर्वाना चालणारा सुवर्ण मध्य ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ जयसिंग देशमुख यांनी केले आहे.

add 

                     जाहिरात

एडवोकेट जयसिंग देशमुख यांनी याबाबत भूमिका मांडली असून शिवराय आणि संभाजी राजांनाही जिजाऊ आदर्श होत्या.सर्वानाच सामावून घेणारे हे नाव आहे. त्यांचे जन्मस्थळ बुलढाणा जिल्हा आहे. सिंदखेड राजा येथे लखुजी राजांच्या पोटी त्यांचा जन्म झाल्याने बुलढाणा जिल्ह्यास मातृतीर्थ जिल्हा असा गौरवपूर्ण उल्लेख राज्यभर होतो. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर किंवा संभाजी राजे यांच्या नावावरून विद्यालया बाबत वाद होणे दुर्दैवी ठरेल. त्यामध्ये जिजाऊ साहेब हा सुवर्णमध्य होईल.शिवाय जिजाऊ चरणी सारेच नतमस्तक आहेत. असे जयसिंग राजांनी म्हटले आहे.

जिजाऊचे नाव अधिक जवळचे-
माजी आ. खेडेकर

आमदार असतांना आपण सिंदखेडराजा येथे ग्रामीण कृषी विद्यालय व्हावे अशी मागणी केली होती.ती मंजुरही झाली होती. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रयत्न पण राहिलेत. दरम्यान शासनाच्या दुर्लक्षपणामुळे ते मागे पडले. आता कृषी महाविद्यालय होत असेल तर ते वादात अडकू नये असे.महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे ते पहाता वाद नको असे वाटते. सरकारने निर्णय घेण्यापूर्वी यावर चर्चा होणे गरजेचे होते. एक वेळेस निर्णय झाला की त्यामध्ये फारसा बदल होत नाही. कॅबिनेटमध्ये जर चर्चा करून बदल करायचा असेल तर हा जिल्हा जिजाऊ साहेबांचा आहे ते नाव अधिक पसंतीचे आहे. त्यांना प्राधान्य देणे अधिक संयुक्तिक राहील.