तासभर धो धो बरसला ! बुलढाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; ' येथे ' बनला नवीन तलाव ! ट्रॅफिकही जाम, बातमीत पहा 'त्या' तलावाचे 'फोटो...
Jul 15, 2024, 13:04 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ब्रेकनंतर पावसाने आज १५ जुलै रोजी बुलडाणा शहरात दमदार हजेरी लावली. ११: ३० ते १२:३० च्या वेळेत तासभर झालेल्या या धुवाधार पावसाने नाल्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. इतकेच नाही तर, काही चौकांमध्ये छोटे तलावसदृश डबके भरगच्च भरले आहे. वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून, स्थानिक आयडीबीआय बँक समोरिल रस्त्यावर भरपूर प्रमाणात पाणी साचले आहे. असा पाऊस दिवसभर झाला पाहिजे, जेणेकरून धरणातील पाणी पातळीत वाढ होईल. अजूनही जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये पाण्याची मुबलक उपलब्धता नाही. यामुळे पाणीटंचाईची समस्या अजूनही कायम असल्याचे नागरिक सांगतात.

