सांगितल होत लग्न दुपारी उरका! झाली ना फजिती! जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळ वारा, तुफान गारपीट; वऱ्हाडी मंडळींची फजिती! हवामान अभ्यासक म्हणतात, ३ मे पर्यंत असच राहणार..

 
jhfjd
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  प्रख्यात हवामान तज्ञ पंजाबराव डख तसेच भारतीय हवामान विभागाने २५ ते २९ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती.  ती, खरी ठरली. गेल्या महिनाभरापासून  जिल्ह्यात  अधूनमधून अवकाळी पाऊसाचा जोर आहे. तत्पूर्वी पूर्व सूचना हवामान विभागाने दिल्या होत्या. लगीनसराई असल्याने शक्यतोवर दुपारी लग्न उरकण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र "पाहून घेऊ", अशी भूमिका लगीनघरच्या लोकांनी घेतली अन् ती चांगलीच अंगलट आली.
 

nature

 आज,२६ एप्रिलच्या दुपारपासून जिल्ह्यात अवकाळीचे मळभ दाटून आले. प्रचंड सोसाट्याचा वारा, काळेभोर आभाळ पाहून वऱ्हाडी मंडळी,वरबाप यांच्या उरात धडकी भरल्याचे चित्र ठिकठिकाणी होते. आज लग्नाची दाट तिथी असल्याने अनेक ठिकाणी विवाह सोहळे आयोजित करण्यात आलेत, मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणचे मंडप उडून गेले. बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा , भादोला, डोंगरशेवली इथे तुफान पाऊस झाला. चिखली तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याचे वृत्त आहे. खामगाव, मेहकर तालुक्यात देखील तीच स्थिती आहे. अनेक गावांमध्ये गारांचा अक्षरशः खच पडलाय. ज्यांनी दुपारी लग्न उरकले त्यांचे ठीक मात्र ज्यांचे लग्न उशिरा आणि उघड्या मैदानात होते त्यांची मात्र अक्षरशः फजिती  होतेय. ३ मे पर्यंत अशाच पद्धतीच्या अवकाळी पावसाचा सामना करावा लागेल असे हवामान तज्ञांचे मत आहे.