वाघाळ्यात रात्री भलतचं घडत! शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार; प्रकरण काय वाचा!

 
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा गावात शेतीपंप धारकांना वीज पुरवठा होत नाही. विजेचा पुरवठा सुरू करताच अज्ञात व्यक्तीकडून  सतत विज वाहिनीवर बिघाड करण्यात येतो, असे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आज २० जानेवारीला साखरखेर्डा पोलिसांनी तक्रार दिली. 

येथील संतोष भागीले हे परिसरात शेतीतील विजे संबंधित काम पाहतात,  वाघाळा गावात शेतीपंपधारकांना वीजपुरवठा करणाऱ्या विजवाहिनीवर मागील सात दिवसांपासून सतत बिघाड होतोय. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत मिळत नाही. दरम्यानच निरीक्षण केल्याक्षणी कुणीतरी अज्ञाताकडून वीज पुरवठेला खंडित केल्या जात असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा मिळत नसल्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, परिसरातील ग्रामस्थांनी आज साखरखेर्डा पोलिसात तक्रार दिली. तक्रारअर्जात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावेळी कनिष्ठ अभियंता चव्हाण, डॉ सोनवणे, गजानन मानतकर, संतोष भागिले, तसेच वाघाळा, हिरवा, गडलिंग, हनवतखेड, येथील सरपंच त्यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.