कर्जमाफीच्या यादीत नाव आहे? मग हे काम आधी करा!

 
money
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केलेली असून, योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या टप्याटप्याने प्रसिध्द होत आहेत. योजनेच्या निकषानुसार यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र अथवा ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे.
आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होते. ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असून अद्यापही आधार प्रमाणिकरण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तात्काळ आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरणासाठी 15 नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून त्‍यापूर्वी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन महेश कृपलानी, सहायक निबंधक, सहकारी संस्था, मलकापूर यांनी केले आहे.