लग्नसराईनिम्मित प्रशासनाचे "हे" आहे काम? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची उपजिल्हा रुग्णालयाला सूचना! विवाह नोंदणीचे कामकाज अता चिखली उपजिल्हा रुग्णयलयात सुरू करण्याचे दिले आदेश..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शासन दरबारी लग्नाची नोंद असणे बंधनकारक आहे. लगीन सराई सुरू झालेली आहे. आणि प्रशासनाने देखील या संबधीत कामाला लागले आहे. चिखली उपजिल्हा रुग्णालयातील विलास गवळी विवाह नोंदणी प्रमुख यांच्या कक्ष येथे रीतसर पद्धतीने एका नवदांपत्याला विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देऊन 'विवाह नोंदणीचा ' चा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक तथा विवाह निबंधक डॉ उमर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. किशोर गवई यांच्या हस्ते विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेली ड्रॉ बाहेकर, विशाल भगत, प्रीति चव्हाण सिस्टर, सुरगुड़े सिस्टर, अनिल बापू मोरे,अमोल मेहेत्रे यांचि उपस्तिथि होती.
 या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी एक पत्र प्रसिद्ध केले होते. त्यानुसार ज्या क्षेत्रात उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी. तसेच नगरपरिषदेच्या क्षेत्रात विवाह नोंदणीचे काम करावयाचे आहे. अशी सूचना देण्यात आली होती. याबाबत त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेशही संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहे.
विवाह नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
१) वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय चिखली यांचे नावाने विनंती अर्ज
२) पती/पत्नी चे आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला (कलर झेरॉक्स)
३) १०० रुपयाचे बॉड पेपरवर प्रतिज्ञालेख (अॅफिडिएट)
४) १०० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प टिकीट
५) तीन साक्षीदाराचे आधार कार्ड (कलर झेरॉक्स) व पासपार्ट फोटो
६) पती/पत्नी चे पासपार्ट फोटो प्रत्येकी तीन
७) पती/पत्नी चे लग्णाचा हार घातलेला वरवधूचा एक फोटो व वरवधू नातेवाईकासह एक फोटो
८) चालु वर्षातील नगर परिषद कार्यालय चिखली असेसमेंट नक्क्लची मुळप्रत
९) ग्रामपंचायत किंवा नगर परिषद ना हरकत प्रमाणपत्र (चिखली शहरा बाहेरील वर किंवा वधु असेल तर आवश्यक आहे.)
विवाह नोंदनी साठी आवश्यक फि 
एक वर्षाच्या आत नोंदनीसाठी 135 रू 
नंतरचा वर्ष साठी लेट फि 235 फक्त रू अकारली जाते