लोणार शहरात इंटरनेट सेवेचा बट्टयाबोळ! दैनंदिन कामे रखडली

 
लोणार( प्रेम सिंगी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार शहरासह तालुक्यात इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. त्यामुळे ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.गेल्या दोन ,तीन दिवसांपासून हा प्रकार सातत्याने घडतोय.
 

लोणार शहरात शायबर कॅफे,  शासकीय कार्यालये, राष्ट्रीयकृत बँका नागरी बँका व निमशासकीय कार्यालयांमध्ये इंटरनेट सेवेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. सर्व उपकरणे इंटरनेटशी जोडली गेल्याने कामांची भिस्त संगणकावर अवलंबून आहे. त्यामुळे सातत्याने खंडित होणाऱ्या इंटरनेट सेवेमुळे मोठ्या प्रमाणात दैनंदिन कामे रखडले आहेत. ऑनलाइन यंत्रणा कोलमडली आहे. इंटरनेट सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र असून सेवा देणाऱ्या कंपन्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. ही सेवा वारंवार खंडित होत असल्याने इंटरनेट सेवा असून नसल्यासारखी असल्याचे आता नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. विद्यार्थी, शेतकरी, छोटेव्यापारी यांच्यावर यामुळे मोठा परिणाम होतोय.