BIG BREAKING आत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते! बाहेर गाडी पेटली...

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात थोड्या वेळापूर्वी एक चार चाकी वाहन पेटले. बुलडाणा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग विझवली असून ती आटोक्यात आली आहे..
साडेबाराच्या सुमारास सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात चर्चा सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभी असलेली डस्टर कंपनीची कार पेटली. दरम्यान बॅटरीचा स्फोट झाल्याने कार पेटल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात सकल मराठा समाजाचे आंदोलन ,उपोषण जे काही होईल ते शांततेच्या मार्गाने होईल अशी प्रतिक्रिया यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली.