चिखलीत आज इंदुरीकर महाराजांचे दणदणीत कीर्तन! एसपी सुनील कडासनेही करणार प्रबोधन; बालाजी गृपचे आयोजन; बुलडाणा लाइव्ह वर होणार थेट प्रक्षेपण..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या बालाजी ग्रुपचा आज, ११ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या ह.भ. प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम बालाजी ग्रुपने आयोजित केला आहे.
Hdndnnf
   आज, १८ सप्टेंबर २०२३ रोजी स्थानिक एमआयडीसी परिसरातील जय गुरू गणेश जिनिंगच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांचेही प्रबोधन या कार्यक्रमात होणार आहे. बालाजी ग्रुपने गेल्या वर्षीच्या वर्धापन दिनाला देखील सामाजिक बांधिलकी जोपासत पळसखेड आश्रम येथील सेवासंकल्प येथे १ लाख ५१ हजार रुपयांचे किराणा सामान व धान्य दिले होते, याहीवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजप्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आज १८ हरतालिका व्रताच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, दुपारी ३:३० ते ६:३० यावेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बालाजी ग्रुप चिखली च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलडाणा लाइव्ह च्या वाचकांना बुलडाणा लाइव्ह च्या यु-ट्युब चॅनल वर पाहता येईल.