शेळगाव आटोळ येथील राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या शाखेचा शुभारंभ! संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके म्हणाले, राजर्षी शाहू पतसंस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा!

 
e

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनली असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी केले.

तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या शाखेचा शुभारंभ १६ जून रोजी त्यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲड. जयश्रीताई शेळके, संस्थेच्या  संचालक अर्चनाताई शेळके, राजेंद्र सुसर, सुरेश गवई, सुभाष गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी ठेवीदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच राजर्षी पे, क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाला शेळगाव आटोळचे सरपंच सुरेश राजे, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कृष्णा मिसाळ, पांडुरंग भुतेकर, समाधान परिहार, पोलीस पाटील वसंतराव बोर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष रामराव बोर्डे, ग्रा. पं. सदस्य विकास मिसाळ, संतोष आटोळे, कैलास बोर्डे, माजी सभापती दगडू वरपे, मंगरुळचे सरपंच ज्ञानेश्वर वरपे, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील मिसाळ, इसरुळ सरपंच सतीश पाटील भुतेकर, माजी सरपंच श्याम पाटील भुतेकर, सुरेश पाटील भुतेकर, ग्रा. पं. सदस्य भिकनराव भुतेकर, बंडू पाटील मिसाळ, राजू मिसाळ, मिलिंद भुतेकर, ग्रा. पं. सदस्य किरणताई मिसाळ, छायाताई पवार, सविताताई गावडे, अभय बाहेती, संतोष काळे, दत्तात्रय मिसाळ, अमजदखा पठाण, जगन्नाथ उबरहंडे, गजानन परिहार, जीवन सिरसाठ यांच्यासह  विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.