बुलडाण्यात राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे उद्‌घाटन

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वामी विवेकांनद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने आज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी स्वामी विवेकानंद व राजमामाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले. यावेळी युवांबाबत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या युवा पुरस्कारार्थी नितेश थिगळे, गणेश भोसले, प्रभाकर वाघमारे, श्री.काकडे यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राज्‍य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी केले. आभार श्रीमती मनिषा ढोके यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार, अनिल इंगळे, श्रीमती मनिषा ढोके, विजय बोदडे, सुरेशचंद्र मोरे, कैलास डुडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे आदींनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.