राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेच्या चांडोळ शाखेचे उदघाटन व धान्य गोदामाचे भूमिपूजन; भाऊसाहेब शेळके म्हणाले,धान्य गोदामाचा शेतकऱ्यांना फायदा होईल

 
चांडोळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेची शेती आणि मातीशी नाळ जुळलेली आहे.  शेतीच्यादृष्टीने धान्य गोदामाचे खूप महत्व आहे. संस्थेच्या माध्यमातून चांडोळ येथे १६०० मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम तयार करण्यात येणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांना या धान्य गोदामाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी व्यक्त केला.

राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या (मर्या.शिरपूर) चांडोळ शाखेचे उद्घाटन आणि १० हजार २०० स्वेअर फूट क्षेत्रफळाच्या वेअर हाऊसचे भूमिपूजन २७ ऑगस्ट रोजी त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते  बोलत होते. याप्रसंगी राजर्षी पे, क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला अभिता लॅण्ड सोल्युशन्स प्रा.लि. कंपनीचे सीईओ सुनिल शेळके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲड. जयश्रीताई शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष गणेशराव रिंढे, संचालक राजेंद्र सुसर, सुरेशराव गवई, धाडचे ठाणेदार मनिष गावंडे, सरपंच सुनिल मेहेर, उपसरपंच शिवाजी देशमुख, धाडच्या सरपंच बोर्डेताई, पोलीस पाटील पंकज सोळंके, धाडच्या पोलीस पाटील नंदाताई बोर्डे, सुखदेव पाटील सोनुने, दिलीपराव देशमुख, माजी सरपंच दिलीप उसारे, आघाव मॅडम, लांडे पाटील, मदन जंजाळ, गणेश भोंडे, रिजवान सौदागर, अरुण पाटील तायडे, संदीप टीमकरी, सांडू सनंसे, सुरेश सोनुने, सागर जैस्वाल, प्रकाश देशमुख, भगवान सरोदे, समाधान भवटे, माधव शिंबरे, तेजराव भवटे, जब्बार शेठ, सुभाष राऊत, बाबूसिंग चांदा, विठ्ठल दयावणे, अशोक सोनुने, संजय हुडेकर, रामराव नाईक, नत्थुसिंग बारवाल, सुरेश शिंदे, डॉ.नरवाडे, भानुदास राऊत, संतोष खांडवे, संजय धनावत, ईरला गावचे सरपंच मोहन खंडागळे, उपसरपंच सतपाल मुर्‍हाडे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.