चिखली बसस्थानकावर अपुरी प्रकाशव्यवस्था; रात्रीच्या अंधारात भलतचं काही घडल तर जबाबदार कोण?

 
Bdbx
चिखली(गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठे बसस्थानक असलेल्या चिखली बसस्थानकावर सध्या सोयीसुविधांची वानवा आहे. रात्रीला अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या बसस्थानकावरून जात असतात,त्यामुळे २४ तास स्थानकावर प्रवाशी असतात. मात्र रात्रीला स्थानकावर अपुरी प्रकाश व्यवस्था असल्याने,अंधाराचे साम्राज्य असल्याने प्रवाशांमध्ये भीतीची भावना निर्माण होते...
अंधार असल्याने रात्री अपरात्री नशेखोर तरुणांचे टोळके बसस्थानक परिसरात बिनधास्त फिरत असतात. याशिवाय भामटे पाकिटमार चोर सुद्धा या परिसरात भटकत असतात. बस थांबते त्या ठिकाणी सुद्धा लाईट नसल्याने कोणती बस कुठे जाते याबाबत प्रवाशांचा गोंधळ उडतो अशी स्थिती आहे. रात्रीच्या अंधारात बसस्थानकावर काही भलतचं घडल तर जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केल्या जातोय. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधुन होत आहे..