रणरणत्या उन्हात, अन् पाण्याच्या शोधात अस्वल भुंगाट ! मेहकर तालुक्यातील घुटी शिवारात अस्वलाचा धुमाकूळ...व्हिडिओ बघा!

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर तालुक्यातील जानेफळ लगत घुटी शिवारात आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास अस्वलाचे दर्शन झाले. दरम्यान, एका शेतकऱ्याने अस्वल भुंगाट पळतानाचा हा व्हिडिओ "बुलडाणा लाइव्हला" पाठविला. 
 
दुपारी २:३० वाजेच्या सुमारास जानेफळातील कॅनॉलच्या परिसरात सर्वप्रथम अस्वल आढळले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती, मोठ्या प्रमाणात नागरिक गोळा झाले होते. डोंगराळ भागातून पाण्याच्या शोधासाठी अस्वल आले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी नागरिकांच्या आवाजाची चाहूल लागताच अस्वलाने एका शेतातूनच डोंगर भागाकडे धूम ठोकली. दरम्यान वन विभागाला याबाबत माहिती मिळताच, घाटबोरी आरएफओ अंकुश येवले, प्रकाश सावळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अस्वलाच्या पाऊलखुणा शोधत बराच वेळ पाठलाग केला. अखेर घुटीरोडवरून उटी भागात अस्वल गेले असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. आज बुलडाणा जिल्ह्यात कमालीचे तापमान आहे. सूर्य अक्षरशः आग ओकत असताना ठीकठिकाणी, गावखेड्यात शुकशुकाट आहे. अशातच एका शेतात अस्वलाची धुमाकूळ झाल्याने परिसरात एकच चर्चा रंगली आहे.