आमदार श्वेताताईंच्या उपस्थितीत उद्या चिखलीत श्री गणपती अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तनाचे आयोजन !

 
Hdnxn
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सार्वजनिक गणेशोत्सवाचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर पुरोहित यांच्या माध्यमातून श्री गणपती अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तनाचे आयोजन आ. श्वेताताई महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत, दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेदरम्यान करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री शिवबा गणेश मंडळ, श्री दुर्वांकुर अथर्वशीर्ष मंडळ आणि मानव्य क्रीडा ,सांस्कृतिक व बहुद्देशीय संस्था चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या अथर्वशीर्ष पठणात भाविकांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.