चिखलीत 'एक उपवास अन्नदात्यासाठी !' आंदोलन ! वाचा काय आहे पार्श्वभूमी..!

 
chikhali
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दि१९मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर 'एक उपवास अन्नदात्यासाठी' हे आंदोलन करण्यात आले.शेतक-यांच्या प्रश्नांप्रती सहानुभुती असलेले चिखली तालुक्यातील सामाजीक राजकीय व चळवळीतील संवेदनशील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतक-यांच्या समस्यांची जाणीव शासनकर्त्यांना व अधिका-यांना व्हावी आणि त्यांचा शेतक-याप्रती असलेला दृष्टिकोन बदलावा तसेच शेतकरी आत्महत्यांचे सत्र कुठे तरी थांबावे , हिच जाणीव ठेवुन महाराष्ट्र भर अनेक सामाजीक कार्यकर्ते दरवर्षी १९मार्च या दिवसी 'एक उपवास अन्नदात्यासाठी ' हे आंदोलन करतात. १९मार्च १९८६रोजी महाराष्ट्रातील पहिली सरकारी दप्तरी नोंद असलेली शेतकरी आत्महत्या झाली. यवतमाळ जिल्हयातील चिलगव्हाण येथील बागायतदार शेतकरी साहेबराव करपे पाटिल यांनी कर्ज बाजारीपणा व शासकीय धोरणांना कंटाळुन पवणार येथील आश्रमात पत्नी व मुला बांळासह आत्महत्या केली होती.या आत्महत्येमुळे यवतमाळसह संपुर्ण महाराष्ट्र हळहळला, पण आत्महत्यांचे सत्र तेव्हापासुन जे सुरु झाले ते अजुनही थांबले नाही.शासनकर्ते व धोरण राबविणा-यांना शेतक-यांच्या समस्यांवर अजुनही उपाय सापडलेले नाहीत किवा कायम स्वरुपी उपाय करण्याची ईच्छाशक्ती नसावी त्यामुळे शेतकरी आत्महत्या सुरुच आहेत. हे दुर्देवी चित्र बदलाव यासाठी दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील या आंदोलनात चिखली तालुक्यातील संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते या वर्षी सुद्धा सहभागी झाले. 

 राजकीय पक्षपात व भेदभाव न करता शेतक-यांचे प्रश्न सुटावेत या प्रामाणिक हेतुने हे आंदोलन करण्यात आले यावेळी डॉ सत्येंद्र भुसारी,समाधान कणखर,विनायक सरनाईक,देविदास कणखर,कैलास गाडेकर,बिदुसिंग इंगळे,गोविंद देव्हडे,दत्ता सुसर, योगेश शर्मा,उध्दव पाटिल,समाधान गिते,रामभाऊ भुसारी,शुभम डुकरे गजानन परीहार,गजानन भणगे,मुरलीधर येवले,लक्ष्मण भिसे,रामेश्वर आंभोरे,पवण शिराळे,रमाकांत कपुर,निलय देशमुख,यांच्यासह शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.